my india

my india
देशभक्ती गीते

शनिवार, १९ मार्च, २०१६

मुल्यमापन नोंदी

मूल्यमापन नोंदी ==================== ------------------------------------------ =============== 🔘नोंदी कशा कराव्यात..!🔘@@@@@@@@@@@@@ ♻व्यक्तिमत्व गुणविशेष ♻ ⚫1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो ⚫2 आपली मते ठामपणे मांडतो ⚫3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो ⚫4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो ⚫5 आत्मविश्वासाने काम करतो ⚫6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो ⚫7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो ⚫8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो ⚫9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो ⚫10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे ⚫11 धाडसी वृत्ती दिसून येते ⚫12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो ⚫13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो ⚫14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो ⚫15 वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो ⚫16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो ⚫17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो ⚫18 शाळेच्या नियमाचे पालन करतो ⚫19 इतराशी नम्रपणे वागतो ⚫20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो ⚫21 नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात ⚫22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो ⚫23 शाळेत येण्यात आनंद वाटतो ⚫24 गृहपाठ आवडीने करतो ⚫25 खूप प्रश्न विचारतो ⚫26 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो ⚫27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ ♻सुधारणा आवश्यक ♻ 🌀1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे 🌀2 अभ्यासात सातत्य असावे 🌀3 अवांतर वाचन करावे 🌀4 शब्दांचे पाठांतर करावे 🌀5 शब्दसंग्रह करावा 🌀6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे 🌀7 नियमित शुद्धलेखन लिहावे 🌀8 गुणाकारात मांडणी योग्य करावी 🌀9 खेळात सहभागी व्हावे 🌀10 संवाद कौशल्य वाढवावे 🌀11 परिपाठात सहभाग घ्यावा 🌀12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे 🌀13 हिंदी भाषेचा उपयोग करावे 🌀14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा 🌀15 गटचर्चेत सहभाग घ्यावा 🌀16 चित्रकलेचा छंद जोपासावा 🌀17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे 🌀18 संगणकाचा वापर करावा 🌀19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा 🌀20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे 🌀21 गटकार्यात सहभाग वाढवावे 🌀22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे 🌀23 हस्ताक्षरात सुधारणा करावी 🌀24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा 🌀25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे 🌀26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे 🌀27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे 🌀28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा 🌀29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा 🌀30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे 🌀31 शालेय परिपाठात सहभाग असावा 🌀32 उपक्रमामध्ये सहभाग असावा 🌀33 लेखनातील चुका टाळाव्या 🌀34 नकाशा वाचनाचा सराव करावा 🌀35 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा 🌀36 नियमित अभ्यासाची सवय लावावी 🌀37 नियमित उपस्थित राहावे 🌀38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा 🌀39 वाचन व लेखनात सुधारणा करावी 🌀40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे 🌀41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे 🌀42 अक्षर सुधारणे आवश्यक 🌀43 भाषा विषयात प्रगती करावी 🌀44 अक्षर वळणदार काढावे 🌀45 गणित सूत्राचे पाठांतर करावे 🌀46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे 🌀47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे 🌀48 गणिती क्रियाचा सराव करा 🌀49 संवाद कौशल्य आत्मसात करावे 🌀50 गणितातील मांडणी योग्य करावे 🌀51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे 🌀52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे @@@@@@@@@@@@@@@@@@ ♻आवड /छंद♻ 🔘1 चित्रे काढतो 🔘2 गोष्ट सांगतो 🔘3 गाणी -कविता म्हणतो 🔘4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो 🔘5 खेळात सहभागी होतो 🔘6 अवांतर वाचन करणे 🔘7 गणिती आकडेमोड करतो 🔘8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो 🔘9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो 🔘10 कथा,कविता,संवाद लेखन करतो 🔘11 वाचन करणे 🔘12 लेखन करणे 🔘13 खेळणे 🔘14 पोहणे 🔘15 सायकल खेळणे 🔘16 चित्रे काढणे 🔘17 गीत गायन 🔘18 संग्रह करणे 🔘19 उपक्रम तयार करणे 🔘20 प्रतिकृती बनवणे 🔘21 प्रयोग करणे 🔘22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे 🔘23 खो खो खेळणे 🔘24 क्रिकेट खेळणे 🔘25 संगणक हाताळणे 🔘26 गोष्टी ऐकणे 🔘27 गोष्टी वाचणे 🔘28 वाचन करणे 🔘29 रांगोळीकाढणे 🔘30 प्रवास करणे 🔘31 नक्षिकाम 🔘32 व्यायाम करणे 🔘33 संगणक 🔘34 नृत्य 🔘35 संगीत ऐकणे@@@@@@@@@@@@@@ ♻मराठी ♻ 🔵" 1" आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो 🔵" 2" ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो 🔵" 3" बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो 🔵" 4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 🔵" 5" प्रभावीपणे प्रकटवाचन करतो 🔵" 6" मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो 🔵" 7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो 🔵" 8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 🔵" 9" लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो 🔵" 10" योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो 🔵" 11" विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो 🔵" 12" स्वत:हून प्रश्न विचारतो 🔵" 13" कविता तालासुरात साभिनय म्हणतो 🔵" 14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 🔵" 15" नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो 🔵" 16" दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो 🔵" 17" विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो 🔵" 18" बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो 🔵" 19" व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो 🔵" 20" भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो 🔵" 21" बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 🔵" 22" ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो 🔵" 23" मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 🔵" 24" निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो 🔵" 25" शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो 🔵" 26" अवांतर वाचन करतो 🔵" 27" गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो 🔵" 28" मुद्देसूद लेखन करतो 🔵" 29" शुद्धलेखन अचूक करतो 🔵" 30" अचूक अनुलेखन करतो 🔵" 31" स्वाध्याय अचूक सोडवितो 🔵" 32" स्वयंअध्ययन करतो 🔵" 33" अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो 🔵" 34" संग्रहवृत्ती जोपासतो 🔵" 35" नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो 🔵" 36" भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो 🔵" 37" लेखनाचे नियम पाळतो 🔵" 38" लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो 🔵" 39" वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो 🔵" 40" दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो 🔵" 41" पाठातील शंका विचारतो 🔵" 42" हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे 🔵" 43" गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो 🔵" 44" वाचनाची आवड आहे 🔵" 45" कविता चालीमध्ये म्हणतो 🔵" 46" अवांतर वाचन ,पाठांतर करतो 🔵" 47" सुविचाराचा संग्रह करतो 🔵" 48" प्रश्नांची अचूक उत्तरे देतो 🔵" 49" दिलेल्या विषयावर निबंध लिहितो 🔵" 50" बोधकथा सांगतो 🔵" 51" वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो @@@@@@@@:@@:@ ♻हिंदी♻ 🔰1 सामान्य सूचनाओ को समझता है 🔰2 स्पष्ट तथा उचित उच्चारण करता है 🔰3 वर्णोका योग्य उच्चारण करता है 🔰4 चिंत्रो को देखकर शब्द कहता है 🔰5 रुचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता है 🔰6 सुनी हुई बाते समझ लेता है और दोहरता है 🔰7 स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता है 🔰8 पाठयांश का आशय समझता है 🔰9 गीत और कविताए कंठस्थ करता है 🔰10 मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता है 🔰11 अपने विचार हिंदी मे व्यक्त करता है 🔰12 मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप करता है 🔰13 हिंदी शब्द तथा वाक्यो का मातृभाषा में अनुवाद करता है 🔰14 मुकवाचन चढाव -उतार और समझतापूर्वक करता है 🔰15 पाठयांश को समझतापूर्वक पढता है 🔰16 मौनवाचन समझतापूर्वक करता है 🔰17 हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता है 🔰18 लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान लेता है 🔰19 नाटयीकरण , वार्तालाप में भाग लेता है 🔰20 पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री पढता है 🔰21 समाचारपत्र दररोज पढता है 🔰22 सुसष्ट और शुद्ध लेखन करता है 🔰23 दिए गए विषयपर स्वयंप्रेरणासे लेखन करता है 🔰24 परिचित विषयपर निबंध लेखन करता है 🔰25 दैनंदिन जीवन में हिंदी भाषा का प्रयोग करता है 🔰26 हिंदी को राष्ट्रभाषा के रूप मे देखता है 🔰27 हिंदी भाषा के प्रति रुचि रखता है 🔰28 हिंदी में कहानी सुनाता है 🔰29 अध्यापको के साथ हिंदी मे बातचीत करता है 🔰30 शुद्धलेखन समझतापूर्वक करता है @@@@@@@@@@@@@@ ♻English ♻ 🔮1 Solve the Activity by confience 🔮2 Copy the Letters and words correctly 🔮3 Read aloud from textbook 🔮4 Write correctly on one line 🔮5 Listen with concentration 🔮6 Read the poem in rhythm 🔮7 Read and act accordingly 🔮8 Read the part in dialougs by understanding 🔮9 Write the answer of questions 🔮10 Take part in language game 🔮11 Read silently by understanding 🔮12 Recite with enjoyment poems and songs 🔮13 Give responses in various contexts 🔮14 identify commonly used words 🔮15 Rearrange the story events 🔮16 Enjoy the rhythm and understand 🔮17 Take the dictation of familiar words 🔮18 Read english daily newspaper @@@@@@@@@@@ ♻गणित ♻ 💡1 संख्या वाचन करतो 💡2 लहान मोठ्या संख्या ओळखतो 💡3 संख्याचा क्रम ओळखतो 💡4 संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो 💡5 बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो 💡6 पाढे पाठांतर करतो 💡7 गुणाकाराने पाढे तयार करतो 💡8 संख्या अक्षरी लिहितो 💡9 अक्षरी संख्या अंकात मांडतो 💡10 संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो 💡11 संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो 💡12 तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो 💡13 संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो 💡14 विविध भौमितिक संबोध समजून घेतो 💡15 विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो 💡16 भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो 💡17 गणितीय चिन्हे ओळखतो 💡18 चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो 💡19 गणितातील सूत्रे समजून घेतो 💡20 सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो 💡21 भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो 💡22 भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो 💡23 विविध परिमाणे समजून घेतो 💡24 परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो 💡25 विविध राशिची एकके सांगतो 💡26 विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो 💡27 उदाहरणे गतीने सोडवितो 💡28 सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो 💡29 आलेखाचे वाचन करतो 💡30 आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो 💡31 दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो 💡32 विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो 💡33 संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो 💡34 संख्या विस्तारीत रूपात लिहितो 💡35 समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो 💡36 अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो 💡37 क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो 💡38 थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो 💡39 उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो 💡40 दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो 💡41 गणितीय कोडी सोडवितो 💡42 सारणी व तक्ता तयार करतो @@@@@@@@@@@@@@@@@@ ♻विज्ञान ♻ 🌷1 विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो 🌷2 विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो 🌷3 आधुनिक शोधाच ी माहिती घेतो 🌷4 आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो 🌷5 वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो 🌷6 विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो 🌷7 वैज्ञानिक राशीची एकके सांगतो 🌷8 विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो 🌷9 चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो 🌷10 धातू व अधातू सांगतो 🌷11 नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो 🌷12 भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो 🌷13 मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो 🌷14 जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो 🌷15 सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो 🌷16 मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो 🌷17 प्रथमोपचाराची माहिती सांगतो 🌷18 परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो 🌷19 अवकाशीय घटना समजून घेतो 🌷20 वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो 🌷21 वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो 🌷22 प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो 🌷23 प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो 🌷24 प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो 🌷25 धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो 🌷26 पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो 🌷27 बदलाचे प्रकार सांगतो 🌷28 बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो 🌷29 पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो 🌷30 नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो 🌷31 समतोल आहाराचे महत्व सांगतो 🌷32 रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो 🌷33 रोगावरील उपायाची माहिती करून घेतो 🌷34 प्रदूषणाचे प्रकार सांगतो 🌷35 प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो 🌷36 प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो 🌷37 वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो 🌷38 पाण्याचे महत्व जाणतो 🌷39 पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो 🌷40 नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो 🌷41 वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो 🌷42 पाणी संवर्धंनासाठी उपाय समजून घेतो 🌷43 अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो 🌷44 विज्ञानातील गंमतीजमती सांगतो 🌷45 टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो 🌷46 वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो @@@@@@@@@@@@@@@@@ ♻इतिहास नागरिकशास्त्र ♻ 🔴2 ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो 🔴3 संविधान व प्रतिज्ञा म्हणतो 🔴4 समाजसुधारकाची माहिती सांगतो 🔴5 संविधानाचे महत्व सांगतो 🔴6 थोर नेत्याची माहिती सांगतो 🔴7 ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो 🔴8 नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो @@@@@@@@@@@@ ♻कला ♻ 🔳1 कलेचे विविध प्रकार समजून घेतो 🔳2 मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो 🔳3 चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो 🔳4 चित्रे सुंदर काढतो 🔳5 प्रमाणबद्ध रेखाटन करतो 🔳6 मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो 🔳7 रंगाच्या छटातील फरक ओळखतो 🔳8 चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो 🔳9 चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो 🔳10 कलात्मक दृष्टीकोन ठेवतो 🔳11 विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो 🔳12 कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो 🔳13 वर्ग सजावट करतो 🔳14 मातीपासून विविध आकार बनवितो 🔳15 स्व निर्मितीतून आनंद मिळवितो 🔳16 नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो @@@@@@@@@@@ ♻कार्यानुभव ♻ 🔷1 कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो 🔷2 कृती,उपक्रम आवडीने करतो 🔷3 उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो 🔷4 तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो 🔷5 परिसर स्वच्छ ठेवतो 🔷6 नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो 🔷7 कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो 🔷8 आधुनिक साधनाचा वापर करतो 🔷9 व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो 🔷10 चर्चेत सहभागी होतो 🔷11 समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो 🔷12 विविध मुल्याची जोपासना करतो 🔷13 साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो 🔷14 शिक्षकाचे सहकार्य घेतो 🔷15 आत्मविश्वासाने कृती करतो 🔷16 समजशील वर्तन करतो 🔷17 ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो 🔷18 समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो 🔷19 दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो 🔷20 प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो 🔷21 प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो @@@@@@@@@@@@@@@ ♻शारीरिक शिक्षण ♻ 🍁1 खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो 🍁2 आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो 🍁3 तालबद्ध हालचाली करतो 🍁4 गटाचे नेतृत्व करतो 🍁5 खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो 🍁6 गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो 🍁7 इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो 🍁8 विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो 🍁9 खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो 🍁10 मैदानावरील विविध कामे आवडीने करतो 🍁11 क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो 🍁12 आरोग्यदायी सवयीचे पालन करतो 🍁13 मनोरंजक खेळात सहभागी होतो 🍁14 शारीरिक श्रम आनंदाने करतो 🍁15 मैदानाची स्वच्छता करतो 🍁16 जय पराजय आनंदाने स्वीकारतो 🍁17 पंचाच्या निर्णयाचे आदर करतो 🍁18 खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो 🍁19 श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो 🍁20 शिस्तीचे पालन करतो 🍁21 विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो 🍁22 विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो 🍁23 विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो 🍁24 कलेविषयी रुचि ठेवतो 🍁25 दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो 🍁26 आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯>

गुरुवार, १७ मार्च, २०१६

जल है तो कल है

जेव्हा पालिकेचे पाणी येते, तेव्हा साहजिकच अगोदर बरेचसे साठवलेले पाणी शिल्लक असते. मग ताजे पाणी आले म्हणून हे शिल्लक राहिलेले पाणी ओतून टाकण्यात येते.प्रत्येक घरातले थोडे थोडे मिळून हजारो लिटर पाणी वाया जाते. केवळ एका खुळचट समजूतीने, ’ ताजे पाणी’. वस्तुत: ज्या ठिकाणी धरणातून पाणीपुरवठा होतो, तो मागच्या वर्षी जो पाऊस पडलेला असतो, त्या पावसाच्या साठवलेल्या पाण्यातून होतो. म्हणजे, जे पाणी आपण ’ताजे’ म्हणून कौतुकाने पितो, ते साधारणत: ८-९ महिने आधीचे असते. केवळ आपल्या घरी पालिकेद्वारे त्या दिवशी ते येत असते. जिथे नदी अथवा विहिरीचे पाणी वापरले जाते, तिथे ताजे पाणी ही संकल्पना योग्य ठरते कारण भूमिगत जलस्त्रोतांमुळे सतत ताजे पाणी येत असते. आपण शहरातील लोकांनी खालील गोष्टींचे पालन केले, तर ’ताजे पाणी’ ह्या चुकीच्या समजूतीमुळे होणारी पाण्याची ही नासाडी सहज टाळू शकतो. १. जरुरीपुरतेच पाणी साठवून ठेवावे. म्हणजे अतिरिक्त न वापरलेले पाणी ओतून टकण्याचा प्रश्नच येणार नाही. २. ताजे पाणी आणि शिळे पाणी ह्या कल्पनांना तिलांजली द्यावी. ३. वरील मुद्दे चटकन अंगवळणी पडत नसतील, तर तोवर हे राहिलेले पाणी ओतून न देता, इतर घरगुती गरजांसाठी वापरावे. ’जल है, तो कल है’>

बुधवार, १६ मार्च, २०१६

गरज शोधाची जननी

स्पर्शातून करा बॅटरी चार्ज.......!  गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं परंतू काहीजण या बाबतीत थोर शास्त्रज्ञ न्यूटनचा मार्ग अवलंबतात. एखाद्या गोष्टीचं कुतूहल जेव्हा व्यक्तीचं ध्येय बनतं तेव्हा होतो एक आविष्कार. अशाच एका कुतूहलातून मुंबईतील राजेश गुरव नावाच्या व्यक्तीनं बनवलीय एक अनोखी बॅटरी...  मुंबईच्या भांडूप परिसरात दहा बाय दहाच्या खोलीत राजेश गुरव राहतात. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राजेश यांनी एक अनोखी बॅटरी तयारी केली आहे. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी वीजेची गरज लागत नाही तर व्यक्तीच्या शरीरातील उष्णता, ही बॅटरी चार्ज करण्यासाठी पुरेशी आहे.  राजेश गुरव यांनी बनविलेल्या बॅटरीमधून चार व्होल्टची वीज निर्मिती होते. ही क्षमता वाढविण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं गुरव यांनी सांगितलंय. मानवी उष्णतेचा वापर करुन वीज निर्मिती करणाऱ्या या प्रयोगाचं पेटंट मिळविण्यासाठी सध्या राजेश प्रयत्न करत आहेत. आपलं हे संशोधन विकत घेण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्याला ऑफर्स दिल्याचं गुरव यांनी सांगितलंय.  कोणत्याही प्रकारचं तांत्रिक शिक्षण नसतांना राजेश गुरव यांनी ही अनोखी बॅटरी तयार केली असून त्यांच्या या प्रयत्नांना आणखी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. समाजात असे अनेक 'फुंगसूक वँग्डू' असून त्यांची वेळीच दखल घेतल्यास अनेक रँचो जगासमोर येतील, हे नक्की. 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 💐..महाराष्ट्र अँडमिन पँनल..💐>

ई मेलचे जनक

आधुनिक ई-मेलचे जनक रे टॉमलिनसन यांचे निधन... 'आधुनिक ई-मेल' व '@' या चिन्हाचा शोध लावणारे आयटी तज्ज्ञ रे टॉमलिनसन यांचे शनिवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. एखाद्या व्यक्तीचा ई-मेल अॅड्रेस नेमका आणि अचूक कसा असेल याचा शोध टॉमलिनसन यांनी लावला होता. सध्या आपण ज्या पद्धतीने ई-मेल पाठवतो, ती पद्धत आधी खूपच क्लिष्ट होती. त्यात तांत्रिक अडचणी होत्या. ई-मेल अॅड्रेस फारच लांबलचक होते. त्यामुळे ई-मेल नेमका कुठल्या अॅड्रेसने पाठवायचा, हेच बऱ्याचदा कळत नसे. परंतु, टॉमलिनसन यांनी १९७१ मध्ये पहिल्यांदा नेटका ई-मेल अॅड्रेस तयार केला. '@' या चिन्हाचा वापर करून ई-मेल अॅड्रेस तयार करण्याची पद्धतच आज जगभरात वापरली जाते. टॉमलिनसन यांनी पहिल्यांदा ई-मेल अॅड्रेस लिहिला व तो ARPANET सिस्टिमवर पाठवला. ARPANET कम्प्युटर नेटवर्क आहे. याचा उपयोग अमेरिकेतील सरकारने इंटरनेटसाठी केला होता. टॉमलिनसन यांनी इंटरनेट नेटवर्कच्या विकासातही योगदान दिलं. त्यावेळी फक्त काही लोकांकडेच कॉम्प्युटर होते. त्यामुळे ई-मेलचे महत्त्व कोणाच्याच लक्षात आले नाही. पण काही वर्षांनी ई-मेल हा आधुनिक जीवनाचा एक भाग झाला. पहिला ई-मेल एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटवर पाठवण्यात आला. हे दोन्ही कम्प्युटर एकाच ठिकाणी आजूबाजूला ठेवण्यात आले होते. टॉमलिनसन यांना हे समजलं. पण ते इतरांना कसं सांगायचं हा प्रश्न होता. त्यांनी त्यावरही मेहनत घेतली. प्रत्येकाला समजावून सांगितल्यानंतर त्यांची कल्पना यशस्वी ठरली आणि कर्मचारी एकमेकांना ई-मेल पाठवू लागले. टॉमलिनसन यांनी ई-मेल अॅड्रेससाठी पहिल्यांदा 'at' (@) चिन्हाचा उपयोग केला होता. आता हा @ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक अविभाज्य व महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. मॅसेच्युसेट आणि रॅन्सेलर या दोन इन्स्टिट्यूटमधून टॉमलिनसन यांनी इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगची पदवी मिळवली होती. बोल्ट बेर्नेक अॅण्ड न्यूमन नोन (BBN) या कंपनीत टॉमलिनसन यांनी पहिली नोकरी केली होती. त्यांच्या निधनानं माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा विश्वकोषच हरवल्याची भावना व्यक्त होतेय. 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 💐....Tech IT Easy....💐0

॥ज्ञानरचनावादी उपक्रम/खेळ॥ ***!!वाचा व राबवा व आनंददायी शिक्षण द्या.!!*** 01 .) स्मरण खेळ – विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतो. हा खेळ घेताना टेबलावर २० – २५ लहान लहान वस्तू ठेवाव्यात.उदा. मोबाईल , पेन , पेन्सील ई. आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यात. मुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात. नंतरत्या वस्तूकापडाने झाकून ठेवाव्यात. नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्या. त्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल. जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल. —————————————— 02 ) ओंजळीने ग्लास भरणे – मुलांना या खेळात फार आनंद मिळतो. प्रथम आपण १० – १२ मुलांचे गट करावेत. नंतर समान आकाराचे गटातील संख्ये नुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे. त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या. मुलांना त्या बादलीतील पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल. ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपला ग्लासभरावा लागेल. या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल. यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पणमदत होईल. —————————————— 03) ठराविक वेळेत गणिते सोडवणे – मुलांना आपण २०-२५ बेरीज , वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची २०-२५ लहान लहान कोणत्याही प्रकारची गणिते देऊ शकतोआणि ४-५ मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतो. त्या वेळेत गणिते उत्तरासह सोडवणे अपेक्षितआहे. सुरुवातीला १ अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावे. अश्याप्रकारे खेळातून गणिताचा सराव घ्यावा. या खेळत १००% मुलांना सहभागी करावे. —————————————— 04. ) एकमेकांना हसवणे – मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावा. काही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणि बसलेल्या मुलांपैकीएकानेयेउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा. मात्र त्यांना हसवताना हात लावायचा नाही. वेगवेगळे हावभाव , वेगवेगळे आवाज काढून, विनोदसांगून त्यांना हसवावे. जे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेता घोषित करावे. ————————————— 05. ) आवाज ओळखणे – एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या मुलाला नावघेऊन बोलवावे. त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे . जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला एक गुण द्यावा . असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा . ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा. —————————————— 06.) खोक्यातील वस्तू ओळखणे – एक मोठे खोके घ्यावे . त्यात लहान लहान बॉल , पेन , पेन्सिल अश्या १०-१२ वस्तू भराव्या . त्यानंतर त्या खोक्याचे तोंड बंद करावे . त्या खोक्याला एका बाजूने मुलांचे हात आत जातील एव्हडे मोठे छिद्र पाडावे. नंतर एका – एका मुलाने त्या खोक्यात हात घालून हाताने चाचपडून वस्तू ओळखाव्या . ————————————————————————————— 07.) वासावरून वस्तू ओळखणे – बाजारात प्लास्टिक चे ग्लास मिळतात ते आपण आणावे . पण ते ग्लास पारदर्शक नसावेत.नंतर एका – एका ग्लासात कांदा , लसुन अश्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि ग्लासला एक एक कागद चिटकवावा. त्या वर चिटकवलेल्या कागदाला सुईने लहान – लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या छीद्रातून वास घेऊन वस्तू ओळखण्यास सांगावे. ————————————————————————————— 08.) फुगे फोडणे – लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवताना त्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावा. पण न हात पाय लावता आणि ३० सेकंदात फुगे फोडावे. असा नियम ठेवावा. दिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेल तो विजेता घोषित करावा. ————————————————————————————— 09.) बॉल फेकून मारणे – या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावे. एक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील मुलांना ठराविक अंतर घेऊन उभे करावे. त्यांच्या हातात ३ प्लास्टिक चे बॉल द्यावेत. प्रत्येकाला ३-३ बॉल मारता येतील. तो बॉल त्यांनी वर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी त्या येणाऱ्या बॉल पासून आपला बचाव करावा. जेवढे बॉल वर्तुळातील मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांना द्यावेत. सर्व मुले संपल्यावर गट बदलावा. ————————————————————————————— 10.) नेमबाजी – ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या वस्तूला बॉल ने नेम मारावा . प्रत्येकाला ३-३ संधी द्याव्यात जेवढ्या वेळा मुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेत. जास्त गुण घेणारा मुलगा विजेता घोषित करावा. ————————————————————————————— 11.) विद्यार्थी ओळखणे – एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत ते पाहायला लावावे . आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावी. नावाचा क्रम चुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावे. अश्याप्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमाने सांगेल तो विजेता ठरवावा. ————————————————————————————— 12.) बादलीत चेंडू टाकणे – एक मोठी बदली घेऊन ठराविक अंतरावर ठेवावी आणि फुटबॉल / vollyball घेऊन त्या बादलीत टाकण्यास सांगावे. प्रत्येक मुलाला तीन संधी द्याव्यात . मुलाने किती वेळा बॉल बादलीत टाकला आणि बॉल बादलीत थांबला यावर क्रमांक ठरवावा. ——————————————————————————— 13.) संदेश पोचवणे – या खेळात १०-१५ मुलांना एका ओळीत बसवावे आणि आपण समोर बसलेल्या मुलाला जवळ बोलवून त्याला एखादे व्याक्य सांगावे. त्या मुलाने जाग्यावर जावून त्याच्या मागे बसलेल्या मुलाच्या कानात ते वाक्य सांगावे. अश्याप्रकारे मुलांनी आपापल्या मागील मुलाला ते वाक्य सांगावे आणि सगळ्यात शेवटी बसलेल्या मुलाने ते वाक्य सगळ्यात पुढे येवून सांगावे. आपण पहिल्या मुलाला सांगितलेले वाक्य आणि शेवटच्या मुलाचे वाक्य फार वेगळे येते. ————————————————————————————— 14.) आंधळी कोशिंबीर – हा खेळ खेळताना एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे.बाकीच्या मुलांनी एक वर्तुळ करून आत थांबावे. डोळे बांधलेल्या मुलाने वर्तुळातील एखाद्या मुलाला पकडावे आणि कोणाला पकडले ते ओळखावे . वर्तुळातील मुलांनी डोळे बांधलेला मुलगा वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याला वेळोवेळी सूचना द्याव्यात. पट्टी बांधलेला मुलगा ज्या मुलाला पकडेल व ओळखेल त्या मुलाच्या डोळ्यावर नंतर पट्टी बांधावी आणि खेळ पुढे सुरु ठेवावा. ————————————————————————————— 15.) विष – अमृत – एक मोठे वर्तुळ आखावे . त्यात सर्व मुले पळतील. त्यांना एक मुलगा शिवायला जाईल. तो ज्या मुलाला शिवल त्या मुलाला विषकतोवावे.

॥ज्ञानरचनावादी उपक्रम/खेळ॥ ***!!वाचा व राबवा व आनंददायी शिक्षण द्या.!!*** 01 .) स्मरण खेळ – विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतो. हा खेळ घेताना टेबलावर २० – २५ लहान लहान वस्तू ठेवाव्यात.उदा. मोबाईल , पेन , पेन्सील ई. आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यात. मुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात. नंतरत्या वस्तूकापडाने झाकून ठेवाव्यात. नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्या. त्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल. जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल. —————————————— 02 ) ओंजळीने ग्लास भरणे – मुलांना या खेळात फार आनंद मिळतो. प्रथम आपण १० – १२ मुलांचे गट करावेत. नंतर समान आकाराचे गटातील संख्ये नुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे. त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या. मुलांना त्या बादलीतील पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल. ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपला ग्लासभरावा लागेल. या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल. यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पणमदत होईल. —————————————— 03) ठराविक वेळेत गणिते सोडवणे – मुलांना आपण २०-२५ बेरीज , वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची २०-२५ लहान लहान कोणत्याही प्रकारची गणिते देऊ शकतोआणि ४-५ मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतो. त्या वेळेत गणिते उत्तरासह सोडवणे अपेक्षितआहे. सुरुवातीला १ अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावे. अश्याप्रकारे खेळातून गणिताचा सराव घ्यावा. या खेळत १००% मुलांना सहभागी करावे. —————————————— 04. ) एकमेकांना हसवणे – मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावा. काही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणि बसलेल्या मुलांपैकीएकानेयेउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा. मात्र त्यांना हसवताना हात लावायचा नाही. वेगवेगळे हावभाव , वेगवेगळे आवाज काढून, विनोदसांगून त्यांना हसवावे. जे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेता घोषित करावे. ————————————— 05. ) आवाज ओळखणे – एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या मुलाला नावघेऊन बोलवावे. त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे . जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला एक गुण द्यावा . असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा . ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा. —————————————— 06.) खोक्यातील वस्तू ओळखणे – एक मोठे खोके घ्यावे . त्यात लहान लहान बॉल , पेन , पेन्सिल अश्या १०-१२ वस्तू भराव्या . त्यानंतर त्या खोक्याचे तोंड बंद करावे . त्या खोक्याला एका बाजूने मुलांचे हात आत जातील एव्हडे मोठे छिद्र पाडावे. नंतर एका – एका मुलाने त्या खोक्यात हात घालून हाताने चाचपडून वस्तू ओळखाव्या . ————————————————————————————— 07.) वासावरून वस्तू ओळखणे – बाजारात प्लास्टिक चे ग्लास मिळतात ते आपण आणावे . पण ते ग्लास पारदर्शक नसावेत.नंतर एका – एका ग्लासात कांदा , लसुन अश्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि ग्लासला एक एक कागद चिटकवावा. त्या वर चिटकवलेल्या कागदाला सुईने लहान – लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या छीद्रातून वास घेऊन वस्तू ओळखण्यास सांगावे. ————————————————————————————— 08.) फुगे फोडणे – लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवताना त्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावा. पण न हात पाय लावता आणि ३० सेकंदात फुगे फोडावे. असा नियम ठेवावा. दिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेल तो विजेता घोषित करावा. ————————————————————————————— 09.) बॉल फेकून मारणे – या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावे. एक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील मुलांना ठराविक अंतर घेऊन उभे करावे. त्यांच्या हातात ३ प्लास्टिक चे बॉल द्यावेत. प्रत्येकाला ३-३ बॉल मारता येतील. तो बॉल त्यांनी वर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी त्या येणाऱ्या बॉल पासून आपला बचाव करावा. जेवढे बॉल वर्तुळातील मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांना द्यावेत. सर्व मुले संपल्यावर गट बदलावा. ————————————————————————————— 10.) नेमबाजी – ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या वस्तूला बॉल ने नेम मारावा . प्रत्येकाला ३-३ संधी द्याव्यात जेवढ्या वेळा मुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेत. जास्त गुण घेणारा मुलगा विजेता घोषित करावा. ————————————————————————————— 11.) विद्यार्थी ओळखणे – एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत ते पाहायला लावावे . आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावी. नावाचा क्रम चुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावे. अश्याप्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमाने सांगेल तो विजेता ठरवावा. ————————————————————————————— 12.) बादलीत चेंडू टाकणे – एक मोठी बदली घेऊन ठराविक अंतरावर ठेवावी आणि फुटबॉल / vollyball घेऊन त्या बादलीत टाकण्यास सांगावे. प्रत्येक मुलाला तीन संधी द्याव्यात . मुलाने किती वेळा बॉल बादलीत टाकला आणि बॉल बादलीत थांबला यावर क्रमांक ठरवावा. ——————————————————————————— 13.) संदेश पोचवणे – या खेळात १०-१५ मुलांना एका ओळीत बसवावे आणि आपण समोर बसलेल्या मुलाला जवळ बोलवून त्याला एखादे व्याक्य सांगावे. त्या मुलाने जाग्यावर जावून त्याच्या मागे बसलेल्या मुलाच्या कानात ते वाक्य सांगावे. अश्याप्रकारे मुलांनी आपापल्या मागील मुलाला ते वाक्य सांगावे आणि सगळ्यात शेवटी बसलेल्या मुलाने ते वाक्य सगळ्यात पुढे येवून सांगावे. आपण पहिल्या मुलाला सांगितलेले वाक्य आणि शेवटच्या मुलाचे वाक्य फार वेगळे येते. ————————————————————————————— 14.) आंधळी कोशिंबीर – हा खेळ खेळताना एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे.बाकीच्या मुलांनी एक वर्तुळ करून आत थांबावे. डोळे बांधलेल्या मुलाने वर्तुळातील एखाद्या मुलाला पकडावे आणि कोणाला पकडले ते ओळखावे . वर्तुळातील मुलांनी डोळे बांधलेला मुलगा वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याला वेळोवेळी सूचना द्याव्यात. पट्टी बांधलेला मुलगा ज्या मुलाला पकडेल व ओळखेल त्या मुलाच्या डोळ्यावर नंतर पट्टी बांधावी आणि खेळ पुढे सुरु ठेवावा. ————————————————————————————— 15.) विष – अमृत – एक मोठे वर्तुळ आखावे . त्यात सर्व मुले पळतील. त्यांना एक मुलगा शिवायला जाईल. तो ज्या मुलाला शिवल त्या मुलाला विष मिळाले असेल त्यामुळे त्याने खाली बसावे. दुसऱ्या मुलांनी त्या बसलेल्या मुलाला शिउन अमृत द्यावे. अमृत मिळाल्यास तो बसलेला मुलगा उठून पळू शकतो. विष देणाऱ्या मुलाने त्यांना अमृत देण्यापासून थांबवावे.>

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

सरल

सरल महत्वाचे : दिनांक २५/१०/२०१५ शिक्षक बंधू आणि भगिनींनो,आज दिवसभरातील घडामोडी पहाता एक पोस्ट लीहाविसी वाटली.म्हणून सरल विषयी पुन्हा एकदा अपडेट देत आहे. १) सर्वप्रथम आपणास हे सांगणे जास्त महत्वाचे आहे की नवीन विद्यार्थी माहिती भरने आणि भरलेल्या विद्यार्थ्यांची माहितीमध्ये बदल करावायाचा असेल तर तो करणे म्हणजे update करणे यासाठी उद्या म्हणजे २६ तारखेपर्यंत मध्यरात्र अखेर मुदत देण्यात आलेले आहे.येथे हे सांगणे अधिक महत्वाचे वाटते की ही मुदत विद्यार्थी माहिती भरण्यासाठी आहे.शिक्षक व शाळा माहिती भरण्यासाठी मुदत सांगितली आहे का किवा मुदत सांगणार आहे का या प्रश्नाचा विचार करन्यापेक्षा ती माहिती लगेच भरने गरजेचे आहे.कारण २६ तारखेला विद्यार्थी माहिती भरली की लगेच संच मान्यता होणार आहे आणि त्यानंतर समायोजन होणार आहे..आणि सामायोजनासाठी शाळा आणि शिक्षक माहिती भरने गरजेचे आहे.त्यामुळे आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून मी सर्वाना आवाहन करत आहे की आता कंटाळा न करता सर्व माहिती प्राधान्याने भरून पूर्ण करा.काही अडचण आली तर संपर्कात रहा. २) जर विद्यार्थी माहिती भरताना असे लक्षात आले की एकाच विद्यार्थ्याचे नाव दोनदा आले आहे तर अशा वेळेला मुख्याध्यापक लॉगीन ला duplicate entry या बटनावर क्लिक करून दोनदा नाव असलेल्या विद्याररर्थ्या च्या नावापैकी एका नावाला मुख्याध्यापकाला delete करता येते.जर एकच विद्यार्थी दोन वेगवेगळ्या शाळेमध्ये नोंद झाला असेल (एका शाळेत नाव नोंद झाला आणि दुसऱ्या शाळेत दाखल झाला असेल आणि दुसर्या शाळेने त्याचे नाव नोंद केले असेल तर अशा वेळेला) तर तो विद्यार्थी शिक्षणाधिकारी यांच्या login ला duplicate entry मध्ये दिसणार आहे.सदर अधिकारी त्या शाळेच्या मुख्याध्यापाकाशी संपर्क करून तो विद्यार्थी खरोखर कोणत्या शाळेचा आहे याची खात्री करत्वील व अनावश्यक नोंद ते delete करतील.ते अधिकार त्यांना देण्यात आलेले आहे. ३) एखादा विद्यार्थी शाळा सोडून इतर शाळे गेला असेल अशा वेळी दुसर्या शालेच्या मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे की आपल्या शाळेचा UDISE NO देऊन सरल मधील माहिती ONLINE TRANSFER करायला सागतील.दुसर्या मुख्याध्यापकाने परस्पर त्या मुलाची नोंद सरल मध्ये घेऊ नये.एकदा मुलाचे नाव ट्रान्स्फर केले की ;लगेच त्या मुलाचे नाव पहिल्या शाळेतून कमी होणार नाही.पहिल्या शाळेतून नाव ट्रान्स्फर केले की जिल्ह्यातील त्या दुसर्या शाळेत ते नाव जोपर्यंत ACCEPT केले जात.नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याचे नाव आधीच्या शाळेत दिसेल.त्या विद्यार्थ्याच्या नावाला DELETE कसे करावे यासाठी विचार करण्यात वेळ घालू नये.राज्याबाहेर शिकायला गेलेल्या मुलांच्या बाबतीत त्या विद्यार्थ्यालादेखील TRANSFER करायचे आहे.फक्त असे विद्यार्थी इतर राज्याने ACCEPT करायची गरज राहणार नाही.त्यांचे नाव विद्यार्थी यादीतून कमी होतील..सध्या फक्त TRANSFER TAB दिलेली आहे.ACCEPT करण्याची TAB लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.ट्रान्स्फर करताना भरावयाची माहिती मध्ये जिल्ह्याचे नाव भरने अनिवार्य आहे.इतर माहिती असेल तर भरायला हरकत नाही. ४) जरी विद्यार्थी VERIFY होत नसतील तर याबाबत गोंधळून जाण्याची आवशकता नाही आहे.विद्यार्थी नाव नोंदणी केल्यावर आपोआप तशी आकडेवारी वरिष्ठ कार्यालायाकडे दिसते.VERIFY करायची त्यासाठी गरज पडत नाही.आवशक्तेनुसार VERIFY करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध केली जाईलच. ५) याचसोबत शाळा माहिती भरून घ्यावी आणि त्यानंतर स्टाफ चे काम पूर्ण करावे.शाळा माहिती भरताना काळजीपूर्वक भरावी कारण या माहितीवर स्टाफ ची माहिती DEPEND असणार आहे.शाळा माहिती चुकली असेल तर CLUSTER लेवल वरून चुकलेले पेज RETURN करायला मुख्याध्यापकाच्या ACOUNT वरून प्रत्येक पेज ला REQUEST TO RETURN करण्याची सुविधा दिली आहे.त्याचा उपयोग करून घ्यावा. ६) आज अखेर पर्यंत पायाभूत चाचणीचे गुण भरायची सुविधा चालू झालेली नाही आहे त्यामुळे याबाबत चर्चा न केलेले बरे.सदर गुणांची नोंद ही ऑफलायीन भरायची आहे.STUDENT पोर्टल मध्ये आपण ज्या ठिकाणी login करतो त्या login बाहेरच्या पेज वर student च्या पायाभूत चाचणीच्या गुणांची नोंद भरण्याची यादी ही download करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.ही यादी gender निहाय आणि अल्फाबेटीकली अशा दोन प्रकारे download करण्याची सुविधा दिली जाणार आहे.ती यादी download करावी आनि गुण भरावे व पुन्हा ही यादी upload करायची आहे.download जवळच upload ची सुविधा दिली जाणार आहे.सदर यादी download करताना शाळेचा udise no आणि PASSWORD अचूक असणे खूप महत्वाचे आहे.अन्यथा विद्यार्थ्यांचे गुण system मध्ये भरले जाणार नाही.ही यादी वर्गनिहाय वेगवेगळी download आणि upload करायची आहे.upload केलेली यादी ही त्याच दिवशी न दिसता आपल्या acount ला दुसऱ्या दिवशी update झालेली दिसेल.सदर प्रोसेस ही ऑफलायीन आहे.याची नोंद घ्यावी.हे गुण फक्त मुख्याध्यापकाच्या आय डी आणि password ने भरले जाणार आहे.या ठिकाणी हे पुन्हा एकदा स्पष्ट सांगत आहे की पायाभूत चाचणीचे गुण भरायची सुविधा अद्याप सुरु झालेली नाही आहे.सदर माहिते भाराने चालू झालेले आहे असा विनाकारण गैरसमज करून घेऊ नये.आणि student पोर्टल ओपण करून sytem busy करण्यास हातभार लावू नये ही विनंती,. ७) स्टाफ आणि शाळेच्या भरावयाच्या माहिती बाबत अडचण निर्माण झाली तर आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉगला भेट द्या.या ब्लॉग वर सर्व अडचणी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.इतर अद्यावत माहिती उद्या म्हणजेच २६ तारखेला देण्याचा प्रयत्न करेल.धन्यवाद. (प्राथ.शिक्षक)

मोबाईल द्वारे ppt बनविणे     या लिंकवर क्लिक करून मोबाईMob द्वारे ppt बनविणे हा माझा व्हिडीओ पाहू शकता. मी श्री भालचंद्र भोळे,भिवंडी 🙏 ...