my india

my india
देशभक्ती गीते

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

सरल

सरल महत्वाचे : दिनांक २५/१०/२०१५ शिक्षक बंधू आणि भगिनींनो,आज दिवसभरातील घडामोडी पहाता एक पोस्ट लीहाविसी वाटली.म्हणून सरल विषयी पुन्हा एकदा अपडेट देत आहे. १) सर्वप्रथम आपणास हे सांगणे जास्त महत्वाचे आहे की नवीन विद्यार्थी माहिती भरने आणि भरलेल्या विद्यार्थ्यांची माहितीमध्ये बदल करावायाचा असेल तर तो करणे म्हणजे update करणे यासाठी उद्या म्हणजे २६ तारखेपर्यंत मध्यरात्र अखेर मुदत देण्यात आलेले आहे.येथे हे सांगणे अधिक महत्वाचे वाटते की ही मुदत विद्यार्थी माहिती भरण्यासाठी आहे.शिक्षक व शाळा माहिती भरण्यासाठी मुदत सांगितली आहे का किवा मुदत सांगणार आहे का या प्रश्नाचा विचार करन्यापेक्षा ती माहिती लगेच भरने गरजेचे आहे.कारण २६ तारखेला विद्यार्थी माहिती भरली की लगेच संच मान्यता होणार आहे आणि त्यानंतर समायोजन होणार आहे..आणि सामायोजनासाठी शाळा आणि शिक्षक माहिती भरने गरजेचे आहे.त्यामुळे आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून मी सर्वाना आवाहन करत आहे की आता कंटाळा न करता सर्व माहिती प्राधान्याने भरून पूर्ण करा.काही अडचण आली तर संपर्कात रहा. २) जर विद्यार्थी माहिती भरताना असे लक्षात आले की एकाच विद्यार्थ्याचे नाव दोनदा आले आहे तर अशा वेळेला मुख्याध्यापक लॉगीन ला duplicate entry या बटनावर क्लिक करून दोनदा नाव असलेल्या विद्याररर्थ्या च्या नावापैकी एका नावाला मुख्याध्यापकाला delete करता येते.जर एकच विद्यार्थी दोन वेगवेगळ्या शाळेमध्ये नोंद झाला असेल (एका शाळेत नाव नोंद झाला आणि दुसऱ्या शाळेत दाखल झाला असेल आणि दुसर्या शाळेने त्याचे नाव नोंद केले असेल तर अशा वेळेला) तर तो विद्यार्थी शिक्षणाधिकारी यांच्या login ला duplicate entry मध्ये दिसणार आहे.सदर अधिकारी त्या शाळेच्या मुख्याध्यापाकाशी संपर्क करून तो विद्यार्थी खरोखर कोणत्या शाळेचा आहे याची खात्री करत्वील व अनावश्यक नोंद ते delete करतील.ते अधिकार त्यांना देण्यात आलेले आहे. ३) एखादा विद्यार्थी शाळा सोडून इतर शाळे गेला असेल अशा वेळी दुसर्या शालेच्या मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे की आपल्या शाळेचा UDISE NO देऊन सरल मधील माहिती ONLINE TRANSFER करायला सागतील.दुसर्या मुख्याध्यापकाने परस्पर त्या मुलाची नोंद सरल मध्ये घेऊ नये.एकदा मुलाचे नाव ट्रान्स्फर केले की ;लगेच त्या मुलाचे नाव पहिल्या शाळेतून कमी होणार नाही.पहिल्या शाळेतून नाव ट्रान्स्फर केले की जिल्ह्यातील त्या दुसर्या शाळेत ते नाव जोपर्यंत ACCEPT केले जात.नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याचे नाव आधीच्या शाळेत दिसेल.त्या विद्यार्थ्याच्या नावाला DELETE कसे करावे यासाठी विचार करण्यात वेळ घालू नये.राज्याबाहेर शिकायला गेलेल्या मुलांच्या बाबतीत त्या विद्यार्थ्यालादेखील TRANSFER करायचे आहे.फक्त असे विद्यार्थी इतर राज्याने ACCEPT करायची गरज राहणार नाही.त्यांचे नाव विद्यार्थी यादीतून कमी होतील..सध्या फक्त TRANSFER TAB दिलेली आहे.ACCEPT करण्याची TAB लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.ट्रान्स्फर करताना भरावयाची माहिती मध्ये जिल्ह्याचे नाव भरने अनिवार्य आहे.इतर माहिती असेल तर भरायला हरकत नाही. ४) जरी विद्यार्थी VERIFY होत नसतील तर याबाबत गोंधळून जाण्याची आवशकता नाही आहे.विद्यार्थी नाव नोंदणी केल्यावर आपोआप तशी आकडेवारी वरिष्ठ कार्यालायाकडे दिसते.VERIFY करायची त्यासाठी गरज पडत नाही.आवशक्तेनुसार VERIFY करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध केली जाईलच. ५) याचसोबत शाळा माहिती भरून घ्यावी आणि त्यानंतर स्टाफ चे काम पूर्ण करावे.शाळा माहिती भरताना काळजीपूर्वक भरावी कारण या माहितीवर स्टाफ ची माहिती DEPEND असणार आहे.शाळा माहिती चुकली असेल तर CLUSTER लेवल वरून चुकलेले पेज RETURN करायला मुख्याध्यापकाच्या ACOUNT वरून प्रत्येक पेज ला REQUEST TO RETURN करण्याची सुविधा दिली आहे.त्याचा उपयोग करून घ्यावा. ६) आज अखेर पर्यंत पायाभूत चाचणीचे गुण भरायची सुविधा चालू झालेली नाही आहे त्यामुळे याबाबत चर्चा न केलेले बरे.सदर गुणांची नोंद ही ऑफलायीन भरायची आहे.STUDENT पोर्टल मध्ये आपण ज्या ठिकाणी login करतो त्या login बाहेरच्या पेज वर student च्या पायाभूत चाचणीच्या गुणांची नोंद भरण्याची यादी ही download करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.ही यादी gender निहाय आणि अल्फाबेटीकली अशा दोन प्रकारे download करण्याची सुविधा दिली जाणार आहे.ती यादी download करावी आनि गुण भरावे व पुन्हा ही यादी upload करायची आहे.download जवळच upload ची सुविधा दिली जाणार आहे.सदर यादी download करताना शाळेचा udise no आणि PASSWORD अचूक असणे खूप महत्वाचे आहे.अन्यथा विद्यार्थ्यांचे गुण system मध्ये भरले जाणार नाही.ही यादी वर्गनिहाय वेगवेगळी download आणि upload करायची आहे.upload केलेली यादी ही त्याच दिवशी न दिसता आपल्या acount ला दुसऱ्या दिवशी update झालेली दिसेल.सदर प्रोसेस ही ऑफलायीन आहे.याची नोंद घ्यावी.हे गुण फक्त मुख्याध्यापकाच्या आय डी आणि password ने भरले जाणार आहे.या ठिकाणी हे पुन्हा एकदा स्पष्ट सांगत आहे की पायाभूत चाचणीचे गुण भरायची सुविधा अद्याप सुरु झालेली नाही आहे.सदर माहिते भाराने चालू झालेले आहे असा विनाकारण गैरसमज करून घेऊ नये.आणि student पोर्टल ओपण करून sytem busy करण्यास हातभार लावू नये ही विनंती,. ७) स्टाफ आणि शाळेच्या भरावयाच्या माहिती बाबत अडचण निर्माण झाली तर आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉगला भेट द्या.या ब्लॉग वर सर्व अडचणी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.इतर अद्यावत माहिती उद्या म्हणजेच २६ तारखेला देण्याचा प्रयत्न करेल.धन्यवाद. (प्राथ.शिक्षक)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोबाईल द्वारे ppt बनविणे     या लिंकवर क्लिक करून मोबाईMob द्वारे ppt बनविणे हा माझा व्हिडीओ पाहू शकता. मी श्री भालचंद्र भोळे,भिवंडी 🙏 ...