my india

my india
देशभक्ती गीते
मनपा भिवंडी शाळा 93 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मनपा भिवंडी शाळा 93 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २४ मार्च, २०१६

प्रकल्प विषय

प्रकल्प प्रकल्प यादी इ.१ ली ते ८ वी साठी प्रकल्प नमस्कार मिञांनो, मी आपल्या ब्लाॅगवर इ.१ली ते ८ वीचे नमुनादाखल काही प्रकल्प टाकत आहे ज्याचा उपयोग निश्चितच आपणास होईल... पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी - भाषा -: * परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे. * पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे. * बडबडगीते तोंडपाठ करणे. * चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे. * चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे. * उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग . * परिसरातील विविध स्थळांची माहिती . * वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन . * कथा व कवितांचा संग्रह करणे . * सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह . * वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे. * नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे. * निवडक उतार्यांचा संग्रह करणे . * भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे . * स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे. * शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा. * गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका . * देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा. * विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे. * विविध पत्राचे नमुने जमा करणे. * अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे . * पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे. * शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे. * पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह. * तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा. * आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा. * आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा. * वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा. गणित -: * नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे. * पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव * दुकानास भेट देऊन व्यवहार करणे . * आलेख कागदावर विविध आकार रेखाटा. * बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे . * विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे. * व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे. सामान्य विज्ञान -: * परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे. * परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव. * आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग . * चांगल्या सवयींची यादी -अंगीकार * पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी. * प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह ) * ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य . * वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य . * बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण . * परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग . * उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग . * मातीचे प्रकार व नमुने संग्रह , * घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी. * शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा. * पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती . * शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता . * वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा. * पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी . * गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा. * पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा. * हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा. * शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा. इतिहास व ना.शास्त्र -: * दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे . * ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे . * संतांची चित्रे व माहिती . * शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह . * विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह . * अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा. * शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती . * जहाजांची चित्रे जमवा. * गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा. * देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा. * हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा. * समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा. भूगोल -: * आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती . * ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता . * परिसर भेट - नदी ,कारखाना . * गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती . * परिसरातील पिके व त्यांचा हंगाम. * शेतीस भेट व कामाचे निरीक्षण . * गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे . * खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे . * विविध धान्यांचे नमुने जमवा. * परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा. * गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा. * विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.

बुधवार, १६ मार्च, २०१६

॥ज्ञानरचनावादी उपक्रम/खेळ॥ ***!!वाचा व राबवा व आनंददायी शिक्षण द्या.!!*** 01 .) स्मरण खेळ – विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतो. हा खेळ घेताना टेबलावर २० – २५ लहान लहान वस्तू ठेवाव्यात.उदा. मोबाईल , पेन , पेन्सील ई. आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यात. मुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात. नंतरत्या वस्तूकापडाने झाकून ठेवाव्यात. नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्या. त्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल. जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल. —————————————— 02 ) ओंजळीने ग्लास भरणे – मुलांना या खेळात फार आनंद मिळतो. प्रथम आपण १० – १२ मुलांचे गट करावेत. नंतर समान आकाराचे गटातील संख्ये नुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे. त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या. मुलांना त्या बादलीतील पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल. ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपला ग्लासभरावा लागेल. या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल. यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पणमदत होईल. —————————————— 03) ठराविक वेळेत गणिते सोडवणे – मुलांना आपण २०-२५ बेरीज , वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची २०-२५ लहान लहान कोणत्याही प्रकारची गणिते देऊ शकतोआणि ४-५ मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतो. त्या वेळेत गणिते उत्तरासह सोडवणे अपेक्षितआहे. सुरुवातीला १ अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावे. अश्याप्रकारे खेळातून गणिताचा सराव घ्यावा. या खेळत १००% मुलांना सहभागी करावे. —————————————— 04. ) एकमेकांना हसवणे – मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावा. काही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणि बसलेल्या मुलांपैकीएकानेयेउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा. मात्र त्यांना हसवताना हात लावायचा नाही. वेगवेगळे हावभाव , वेगवेगळे आवाज काढून, विनोदसांगून त्यांना हसवावे. जे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेता घोषित करावे. ————————————— 05. ) आवाज ओळखणे – एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या मुलाला नावघेऊन बोलवावे. त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे . जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला एक गुण द्यावा . असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा . ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा. —————————————— 06.) खोक्यातील वस्तू ओळखणे – एक मोठे खोके घ्यावे . त्यात लहान लहान बॉल , पेन , पेन्सिल अश्या १०-१२ वस्तू भराव्या . त्यानंतर त्या खोक्याचे तोंड बंद करावे . त्या खोक्याला एका बाजूने मुलांचे हात आत जातील एव्हडे मोठे छिद्र पाडावे. नंतर एका – एका मुलाने त्या खोक्यात हात घालून हाताने चाचपडून वस्तू ओळखाव्या . ————————————————————————————— 07.) वासावरून वस्तू ओळखणे – बाजारात प्लास्टिक चे ग्लास मिळतात ते आपण आणावे . पण ते ग्लास पारदर्शक नसावेत.नंतर एका – एका ग्लासात कांदा , लसुन अश्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि ग्लासला एक एक कागद चिटकवावा. त्या वर चिटकवलेल्या कागदाला सुईने लहान – लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या छीद्रातून वास घेऊन वस्तू ओळखण्यास सांगावे. ————————————————————————————— 08.) फुगे फोडणे – लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवताना त्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावा. पण न हात पाय लावता आणि ३० सेकंदात फुगे फोडावे. असा नियम ठेवावा. दिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेल तो विजेता घोषित करावा. ————————————————————————————— 09.) बॉल फेकून मारणे – या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावे. एक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील मुलांना ठराविक अंतर घेऊन उभे करावे. त्यांच्या हातात ३ प्लास्टिक चे बॉल द्यावेत. प्रत्येकाला ३-३ बॉल मारता येतील. तो बॉल त्यांनी वर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी त्या येणाऱ्या बॉल पासून आपला बचाव करावा. जेवढे बॉल वर्तुळातील मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांना द्यावेत. सर्व मुले संपल्यावर गट बदलावा. ————————————————————————————— 10.) नेमबाजी – ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या वस्तूला बॉल ने नेम मारावा . प्रत्येकाला ३-३ संधी द्याव्यात जेवढ्या वेळा मुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेत. जास्त गुण घेणारा मुलगा विजेता घोषित करावा. ————————————————————————————— 11.) विद्यार्थी ओळखणे – एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत ते पाहायला लावावे . आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावी. नावाचा क्रम चुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावे. अश्याप्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमाने सांगेल तो विजेता ठरवावा. ————————————————————————————— 12.) बादलीत चेंडू टाकणे – एक मोठी बदली घेऊन ठराविक अंतरावर ठेवावी आणि फुटबॉल / vollyball घेऊन त्या बादलीत टाकण्यास सांगावे. प्रत्येक मुलाला तीन संधी द्याव्यात . मुलाने किती वेळा बॉल बादलीत टाकला आणि बॉल बादलीत थांबला यावर क्रमांक ठरवावा. ——————————————————————————— 13.) संदेश पोचवणे – या खेळात १०-१५ मुलांना एका ओळीत बसवावे आणि आपण समोर बसलेल्या मुलाला जवळ बोलवून त्याला एखादे व्याक्य सांगावे. त्या मुलाने जाग्यावर जावून त्याच्या मागे बसलेल्या मुलाच्या कानात ते वाक्य सांगावे. अश्याप्रकारे मुलांनी आपापल्या मागील मुलाला ते वाक्य सांगावे आणि सगळ्यात शेवटी बसलेल्या मुलाने ते वाक्य सगळ्यात पुढे येवून सांगावे. आपण पहिल्या मुलाला सांगितलेले वाक्य आणि शेवटच्या मुलाचे वाक्य फार वेगळे येते. ————————————————————————————— 14.) आंधळी कोशिंबीर – हा खेळ खेळताना एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे.बाकीच्या मुलांनी एक वर्तुळ करून आत थांबावे. डोळे बांधलेल्या मुलाने वर्तुळातील एखाद्या मुलाला पकडावे आणि कोणाला पकडले ते ओळखावे . वर्तुळातील मुलांनी डोळे बांधलेला मुलगा वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याला वेळोवेळी सूचना द्याव्यात. पट्टी बांधलेला मुलगा ज्या मुलाला पकडेल व ओळखेल त्या मुलाच्या डोळ्यावर नंतर पट्टी बांधावी आणि खेळ पुढे सुरु ठेवावा. ————————————————————————————— 15.) विष – अमृत – एक मोठे वर्तुळ आखावे . त्यात सर्व मुले पळतील. त्यांना एक मुलगा शिवायला जाईल. तो ज्या मुलाला शिवल त्या मुलाला विषकतोवावे.

॥ज्ञानरचनावादी उपक्रम/खेळ॥ ***!!वाचा व राबवा व आनंददायी शिक्षण द्या.!!*** 01 .) स्मरण खेळ – विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतो. हा खेळ घेताना टेबलावर २० – २५ लहान लहान वस्तू ठेवाव्यात.उदा. मोबाईल , पेन , पेन्सील ई. आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यात. मुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात. नंतरत्या वस्तूकापडाने झाकून ठेवाव्यात. नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्या. त्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल. जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल. —————————————— 02 ) ओंजळीने ग्लास भरणे – मुलांना या खेळात फार आनंद मिळतो. प्रथम आपण १० – १२ मुलांचे गट करावेत. नंतर समान आकाराचे गटातील संख्ये नुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे. त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या. मुलांना त्या बादलीतील पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल. ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपला ग्लासभरावा लागेल. या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल. यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पणमदत होईल. —————————————— 03) ठराविक वेळेत गणिते सोडवणे – मुलांना आपण २०-२५ बेरीज , वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची २०-२५ लहान लहान कोणत्याही प्रकारची गणिते देऊ शकतोआणि ४-५ मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतो. त्या वेळेत गणिते उत्तरासह सोडवणे अपेक्षितआहे. सुरुवातीला १ अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावे. अश्याप्रकारे खेळातून गणिताचा सराव घ्यावा. या खेळत १००% मुलांना सहभागी करावे. —————————————— 04. ) एकमेकांना हसवणे – मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावा. काही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणि बसलेल्या मुलांपैकीएकानेयेउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा. मात्र त्यांना हसवताना हात लावायचा नाही. वेगवेगळे हावभाव , वेगवेगळे आवाज काढून, विनोदसांगून त्यांना हसवावे. जे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेता घोषित करावे. ————————————— 05. ) आवाज ओळखणे – एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या मुलाला नावघेऊन बोलवावे. त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे . जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला एक गुण द्यावा . असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा . ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा. —————————————— 06.) खोक्यातील वस्तू ओळखणे – एक मोठे खोके घ्यावे . त्यात लहान लहान बॉल , पेन , पेन्सिल अश्या १०-१२ वस्तू भराव्या . त्यानंतर त्या खोक्याचे तोंड बंद करावे . त्या खोक्याला एका बाजूने मुलांचे हात आत जातील एव्हडे मोठे छिद्र पाडावे. नंतर एका – एका मुलाने त्या खोक्यात हात घालून हाताने चाचपडून वस्तू ओळखाव्या . ————————————————————————————— 07.) वासावरून वस्तू ओळखणे – बाजारात प्लास्टिक चे ग्लास मिळतात ते आपण आणावे . पण ते ग्लास पारदर्शक नसावेत.नंतर एका – एका ग्लासात कांदा , लसुन अश्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि ग्लासला एक एक कागद चिटकवावा. त्या वर चिटकवलेल्या कागदाला सुईने लहान – लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या छीद्रातून वास घेऊन वस्तू ओळखण्यास सांगावे. ————————————————————————————— 08.) फुगे फोडणे – लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवताना त्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावा. पण न हात पाय लावता आणि ३० सेकंदात फुगे फोडावे. असा नियम ठेवावा. दिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेल तो विजेता घोषित करावा. ————————————————————————————— 09.) बॉल फेकून मारणे – या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावे. एक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील मुलांना ठराविक अंतर घेऊन उभे करावे. त्यांच्या हातात ३ प्लास्टिक चे बॉल द्यावेत. प्रत्येकाला ३-३ बॉल मारता येतील. तो बॉल त्यांनी वर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी त्या येणाऱ्या बॉल पासून आपला बचाव करावा. जेवढे बॉल वर्तुळातील मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांना द्यावेत. सर्व मुले संपल्यावर गट बदलावा. ————————————————————————————— 10.) नेमबाजी – ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या वस्तूला बॉल ने नेम मारावा . प्रत्येकाला ३-३ संधी द्याव्यात जेवढ्या वेळा मुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेत. जास्त गुण घेणारा मुलगा विजेता घोषित करावा. ————————————————————————————— 11.) विद्यार्थी ओळखणे – एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत ते पाहायला लावावे . आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावी. नावाचा क्रम चुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावे. अश्याप्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमाने सांगेल तो विजेता ठरवावा. ————————————————————————————— 12.) बादलीत चेंडू टाकणे – एक मोठी बदली घेऊन ठराविक अंतरावर ठेवावी आणि फुटबॉल / vollyball घेऊन त्या बादलीत टाकण्यास सांगावे. प्रत्येक मुलाला तीन संधी द्याव्यात . मुलाने किती वेळा बॉल बादलीत टाकला आणि बॉल बादलीत थांबला यावर क्रमांक ठरवावा. ——————————————————————————— 13.) संदेश पोचवणे – या खेळात १०-१५ मुलांना एका ओळीत बसवावे आणि आपण समोर बसलेल्या मुलाला जवळ बोलवून त्याला एखादे व्याक्य सांगावे. त्या मुलाने जाग्यावर जावून त्याच्या मागे बसलेल्या मुलाच्या कानात ते वाक्य सांगावे. अश्याप्रकारे मुलांनी आपापल्या मागील मुलाला ते वाक्य सांगावे आणि सगळ्यात शेवटी बसलेल्या मुलाने ते वाक्य सगळ्यात पुढे येवून सांगावे. आपण पहिल्या मुलाला सांगितलेले वाक्य आणि शेवटच्या मुलाचे वाक्य फार वेगळे येते. ————————————————————————————— 14.) आंधळी कोशिंबीर – हा खेळ खेळताना एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे.बाकीच्या मुलांनी एक वर्तुळ करून आत थांबावे. डोळे बांधलेल्या मुलाने वर्तुळातील एखाद्या मुलाला पकडावे आणि कोणाला पकडले ते ओळखावे . वर्तुळातील मुलांनी डोळे बांधलेला मुलगा वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याला वेळोवेळी सूचना द्याव्यात. पट्टी बांधलेला मुलगा ज्या मुलाला पकडेल व ओळखेल त्या मुलाच्या डोळ्यावर नंतर पट्टी बांधावी आणि खेळ पुढे सुरु ठेवावा. ————————————————————————————— 15.) विष – अमृत – एक मोठे वर्तुळ आखावे . त्यात सर्व मुले पळतील. त्यांना एक मुलगा शिवायला जाईल. तो ज्या मुलाला शिवल त्या मुलाला विष मिळाले असेल त्यामुळे त्याने खाली बसावे. दुसऱ्या मुलांनी त्या बसलेल्या मुलाला शिउन अमृत द्यावे. अमृत मिळाल्यास तो बसलेला मुलगा उठून पळू शकतो. विष देणाऱ्या मुलाने त्यांना अमृत देण्यापासून थांबवावे.>

मोबाईल द्वारे ppt बनविणे     या लिंकवर क्लिक करून मोबाईMob द्वारे ppt बनविणे हा माझा व्हिडीओ पाहू शकता. मी श्री भालचंद्र भोळे,भिवंडी 🙏 ...