my india

my india
देशभक्ती गीते

बुधवार, १६ मार्च, २०१६

ई मेलचे जनक

आधुनिक ई-मेलचे जनक रे टॉमलिनसन यांचे निधन... 'आधुनिक ई-मेल' व '@' या चिन्हाचा शोध लावणारे आयटी तज्ज्ञ रे टॉमलिनसन यांचे शनिवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. एखाद्या व्यक्तीचा ई-मेल अॅड्रेस नेमका आणि अचूक कसा असेल याचा शोध टॉमलिनसन यांनी लावला होता. सध्या आपण ज्या पद्धतीने ई-मेल पाठवतो, ती पद्धत आधी खूपच क्लिष्ट होती. त्यात तांत्रिक अडचणी होत्या. ई-मेल अॅड्रेस फारच लांबलचक होते. त्यामुळे ई-मेल नेमका कुठल्या अॅड्रेसने पाठवायचा, हेच बऱ्याचदा कळत नसे. परंतु, टॉमलिनसन यांनी १९७१ मध्ये पहिल्यांदा नेटका ई-मेल अॅड्रेस तयार केला. '@' या चिन्हाचा वापर करून ई-मेल अॅड्रेस तयार करण्याची पद्धतच आज जगभरात वापरली जाते. टॉमलिनसन यांनी पहिल्यांदा ई-मेल अॅड्रेस लिहिला व तो ARPANET सिस्टिमवर पाठवला. ARPANET कम्प्युटर नेटवर्क आहे. याचा उपयोग अमेरिकेतील सरकारने इंटरनेटसाठी केला होता. टॉमलिनसन यांनी इंटरनेट नेटवर्कच्या विकासातही योगदान दिलं. त्यावेळी फक्त काही लोकांकडेच कॉम्प्युटर होते. त्यामुळे ई-मेलचे महत्त्व कोणाच्याच लक्षात आले नाही. पण काही वर्षांनी ई-मेल हा आधुनिक जीवनाचा एक भाग झाला. पहिला ई-मेल एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटवर पाठवण्यात आला. हे दोन्ही कम्प्युटर एकाच ठिकाणी आजूबाजूला ठेवण्यात आले होते. टॉमलिनसन यांना हे समजलं. पण ते इतरांना कसं सांगायचं हा प्रश्न होता. त्यांनी त्यावरही मेहनत घेतली. प्रत्येकाला समजावून सांगितल्यानंतर त्यांची कल्पना यशस्वी ठरली आणि कर्मचारी एकमेकांना ई-मेल पाठवू लागले. टॉमलिनसन यांनी ई-मेल अॅड्रेससाठी पहिल्यांदा 'at' (@) चिन्हाचा उपयोग केला होता. आता हा @ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक अविभाज्य व महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. मॅसेच्युसेट आणि रॅन्सेलर या दोन इन्स्टिट्यूटमधून टॉमलिनसन यांनी इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगची पदवी मिळवली होती. बोल्ट बेर्नेक अॅण्ड न्यूमन नोन (BBN) या कंपनीत टॉमलिनसन यांनी पहिली नोकरी केली होती. त्यांच्या निधनानं माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा विश्वकोषच हरवल्याची भावना व्यक्त होतेय. 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 💐....Tech IT Easy....💐0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोबाईल द्वारे ppt बनविणे     या लिंकवर क्लिक करून मोबाईMob द्वारे ppt बनविणे हा माझा व्हिडीओ पाहू शकता. मी श्री भालचंद्र भोळे,भिवंडी 🙏 ...