my india

my india
देशभक्ती गीते

बुधवार, २८ मार्च, २०१८

मोबाईल द्वारे ppt बनविणे    या लिंकवर क्लिक करून मोबाईMob द्वारे ppt बनविणे हा माझा व्हिडीओ पाहू शकता.

मी श्री भालचंद्र भोळे,भिवंडी
🙏 माझ्या ब्लॉगवर Mob द्वारे ppt आपणा सर्वांचे स्वागत करतो💐💐
चला तर मग प्रत्यक्ष कार्यशाळेला सुरू करूया🙏
१)सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून WPS app download करा...ओपन करून प्लस या चिन्हावर क्लिक करा
२) नंतर new प्रेझेंटेशन या बटनावर क्लिक करा
३)स्टेप 3 मध्ये तुम्हाला दोन बॉक्सेस दिसते वरच्या बॉक्सवर तुम्हाला टायटल टाकायचा अाहे व खालच्या बॉक्सवर तुम्हाला subtitle म्हणजेच उपघटक टाकायचा आहे.. बॉक्सवर हलकासा tap केल्यास तुम्हाला एडिट ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्हाला text लिहायचे आहे... text लिहून झाल्यावर  select all करूंन  त्याखाली  *B option* अक्षरे boldकरण्यासाठी आहे व हे *A+ ,A-* हे option अक्षरे  size मोठी व छोटी करण्यासाठी आहेत.. त्यापुढे *बॅकग्राऊंडला व अक्षरांना रंग देणारे ऑप्शन* सिलेक्ट करून तुमच्या आवडीचा रंग निवडू शकता
४)   शीर्षक व उपशीर्षक देऊन झाल्यावर  तुम्हाला खाली +स्लाईड चिन्ह दिसेल.. नवीन स्लाइड घेण्यासाठी त्यावर क्लिक करा
५) येथे तुम्हाला विविध प्रकारचे  lay out दिसतील...
६) layoutमधून तुम्हाला blank slide निवडायची आहे.....  अशा blank slides तुम्ही लेआऊटमधून  तुमच्या गरजेनुसार आधीच निवडून घ्या
७) नवीन blank slide घेतल्यावर पिक्चर या चिन्हावर क्लिक करून तुम्हाला हवा तो फोटो गॅलरीतून निवडा व स्लाइडमध्ये टाका
९) photos स्लाइड च्या आकारानुसार adjust करा ..त्यानंतर textbox वर क्लिक करून स्लाईडवर लिहा..
*Shape* या चिन्हावर क्लिक केल्यास तुम्हाला विविध आकारात  text लिहू शकता.. अक्षरांना तसेच विविध आकाराला background मध्ये तुम्ही तुम्हाला हवा तो रंग देऊ शकता...
११) सर्व स्लाईड्समध्ये फोटो टाकल्यावर... *Menu* वर क्लिक करून तुम्ही प्रत्येक स्‍लाईडला  *ट्रान्झिशन* द्या किंवा सर्वांना एकच प्रकारचे *ट्रान्झिशन* ठेवू शकता
 १२) स्‍लाईडला  *Music* देण्यासाठी मेनू या ऑप्शनवर क्लिक करा... *Insert*  बटन दाबा ...आता audio वर click करून तुम्ही मोबाईल मधील कोणतंही गाणं slide ला जोडु शकता
 १४) यानंतर *Done* वर क्लीक केल्यावर *tools box*  वर क्लिक करा *Save* ऑप्शन निवडा.तुम्हाला  येथे internal memory, sd card ,my documents यासारखे option दिसतील..*My documents* मध्ये *Ppt* ला नाव देवुन save करा....... तसेच तुम्हाला  *pdf* हवी असल्यास pdf नाव देवुन save करा...यापुढे विविध सोशल मीडियाला शेअर ही करू शकता..💐🙏🙏

गुरुवार, २४ मार्च, २०१६

प्रकल्प विषय

प्रकल्प प्रकल्प यादी इ.१ ली ते ८ वी साठी प्रकल्प नमस्कार मिञांनो, मी आपल्या ब्लाॅगवर इ.१ली ते ८ वीचे नमुनादाखल काही प्रकल्प टाकत आहे ज्याचा उपयोग निश्चितच आपणास होईल... पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी - भाषा -: * परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे. * पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे. * बडबडगीते तोंडपाठ करणे. * चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे. * चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे. * उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग . * परिसरातील विविध स्थळांची माहिती . * वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन . * कथा व कवितांचा संग्रह करणे . * सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह . * वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे. * नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे. * निवडक उतार्यांचा संग्रह करणे . * भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे . * स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे. * शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा. * गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका . * देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा. * विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे. * विविध पत्राचे नमुने जमा करणे. * अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे . * पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे. * शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे. * पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह. * तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा. * आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा. * आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा. * वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा. गणित -: * नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे. * पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव * दुकानास भेट देऊन व्यवहार करणे . * आलेख कागदावर विविध आकार रेखाटा. * बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे . * विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे. * व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे. सामान्य विज्ञान -: * परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे. * परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव. * आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग . * चांगल्या सवयींची यादी -अंगीकार * पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी. * प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह ) * ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य . * वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य . * बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण . * परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग . * उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग . * मातीचे प्रकार व नमुने संग्रह , * घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी. * शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा. * पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती . * शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता . * वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा. * पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी . * गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा. * पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा. * हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा. * शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा. इतिहास व ना.शास्त्र -: * दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे . * ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे . * संतांची चित्रे व माहिती . * शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह . * विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह . * अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा. * शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती . * जहाजांची चित्रे जमवा. * गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा. * देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा. * हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा. * समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा. भूगोल -: * आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती . * ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता . * परिसर भेट - नदी ,कारखाना . * गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती . * परिसरातील पिके व त्यांचा हंगाम. * शेतीस भेट व कामाचे निरीक्षण . * गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे . * खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे . * विविध धान्यांचे नमुने जमवा. * परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा. * गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा. * विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

येथे clickकरा

मोबाईल द्वारे ppt बनविणे     या लिंकवर क्लिक करून मोबाईMob द्वारे ppt बनविणे हा माझा व्हिडीओ पाहू शकता. मी श्री भालचंद्र भोळे,भिवंडी 🙏 ...